हिंगोली जिल्हात ट्रॅक्टरमधून होत असलेली वाळू चोरी पकडत १७ लाखांचा मुद्देमाल जप्त
हिंगोली: हिंगोली जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज बासंबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या खानापूर चित्ता इथं तीन ट्रॅक्टरमधून होत असलेली वाळू चोरी पकडत वाळू आणि ट्रॅक्टर असा १७ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वाळू वाहतूक करणारे आणि रेती मालक अशा सहा जणांविरुद्ध बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे .
