हिजाब बंदीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठातील दोन न्यायमूर्तींत मतभिन्नता
नवी दिल्ली, दि. १३ : हिजाब बंदीच्या खटल्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायमूर्तींमध्ये मतभिन्नता झाल्याने हे प्रकरण सरन्यायाधीशांकडे पाठवण्यात आलं आहे. कर्नाटक सरकारनं शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदीचा लागू केलेला निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयानं मान्य केल्यानंतर, या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं.
या प्रकरणी दाखल विविध याचिकांवरच्या सुनावणीनंतर, न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाचा निकाल अवैध ठरवला. तर, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांनी, हिजाब बंदीचा निर्णय योग्य ठरवला. त्यामुळे आता हे प्रकरण सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालच्या तीन सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणीसाठी पाठवण्यात आलं आहे.
Source – AIR
