Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘या’ नव्या निरव मोदीचा ३ हजार कोटींचा घोटाळा उघड

वस्तू आणि सेवा कर(GST) गुप्तवार्ता महासंचालनालयाच्या मुंबई विभागाने उघड केला ३ हजार कोटींचा घोटाळा

मुंबई: वस्तू आणि सेवा कर(GST) गुप्तवार्ता महासंचालनालयाच्या मुंबई विभागाने सुनील हायटेक इंजिनिअरिंग लिमिटेडचे संचालक सुनील रत्नाकर गुट्टे यांना बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट वापरल्याबद्दल आणि दुसऱ्याला दिल्याच्या आरोपाखाली काल, १२ नोव्हेंबर २०२० रोजी अटक केली. वस्तू किंवा सेवांचा प्रत्यक्ष पुरवठा न करता बोगस पावत्यांच्या बळावर ५२० कोटी रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवण्यात आले.

वस्तू आणि सेवा कर गुप्तवार्ता महासंचालनालयाच्या मुंबई विभागाच्या तपासणीनुसार असे आढळले आहे की विविध कंपन्यांचा मोठा समूह या फसवणुकीत सहभागी आहे. सुनील हायटेक इंजिनिअर्स लिमिटेडने अंदाजे ३,००० कोटी रुपयांच्या बनावट पावत्या दिल्या आणि घेतल्या. यात ५२० कोटी रुपये आयटीसी समाविष्ट आहे. महासंचालनालयाने देशभरात केलेल्या तपासात उघड झाले आहे की या बोगस बिलांचे लाभार्थी नवी दिल्ली, हैदराबाद, लुधियाना, गुरुग्राम, मेरठ, अहमदाबाद, कोलकातासह देशाच्या सर्व भागात आहेत. तपासात असे दिसून आले आहे की सुनील हायटेक इंजिनियर्स लि. हे संपूर्ण भारतात बनावट आयटीसी कार्टेलमध्ये सहभागी असलेल्या प्रमुख गैैरव्यवहार करणाऱ्या कंपन्यापैकी एक आहे.

समांतर कारवाईत, वस्तू आणि सेवा कर गुप्तवार्ता महासंचालनालयाच्या मुंबई विभागाने ओशिया फेरो अ‍ॅलोय प्रा. लि.चे संचालक विजेंद्र विजयराज रंका यांना अटक केली. सध्या सुरु असलेल्या चौकशीच्या अनुषंगाने महासंचालनालयाने ओशिया फेरो अ‍ॅलोय प्रा. लि. च्या बोगस व्यवहारांचा शोध घेतला. त्यानंतरच्या चौकशीत असे निष्पन्न झाले की ओशिया फेरो अ‍ॅलोय प्रा. लिमिटेडने १३७१ कोटी रुपयांच्या बोगस पावत्या जारी केल्या तसेच कोणतीही वस्तू किंवा सेवा न घेता बोगस चालान घेतले. यात २०९ कोटी आयटीसीचा समावेश आहे. ओशिया फेरो अ‍ॅलोय प्रा. लि. ने सुनील हायटेक इंजिनिअर्स लिमिटेडला भरीव पुरवठा केल्याचेही उघड झाले आहे.

हे बोगस व्यवहार फक्त बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट तयार करण्यासाठीच नव्हे तर कृत्रिमरित्या उलाढाल वाढवण्यासाठी देखील वापरण्यात आले जेणेकरुन जास्त पत मर्यादा आणि बँक कर्ज मिळू शकेल आणि हळूच निधीही काढून घेता येईल.

सीजीएसटी कायदा २०१७ च्या कलम १३२ नुसार वस्तू किंवा सेवांचा पुरवठा केल्याशिवाय इनव्हॉइस किंवा बिल जारी करणे आणि वस्तू किंवा सेवांचा पुरवठा न करता बिल / इनव्हॉइसवर इनपुट टॅक्स क्रेडिटचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेणे किंवा त्याचा वापर करणे दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे .

मेसर्स सुनील हायटेक इंजिनियर्स लि. आणि श्री ओशिया फेरो अ‍ॅलोय प्रा. लि., यांनी केलेल्या मोठ्या फसवणूकीच्या पार्श्वभूमीवर संचालकांना केंद्रीय वस्तू व सेवा कायदा , 2017 च्या कलम 132 (1) (b)आणि 132 (1) (c) अंतर्गत गुन्हा केल्याबद्दल अटक करण्यात आली आणि उच्च न्यायालयात हजर केले गेले. दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *