मुंबईत गोरेगाव येथील इमारतीला आग लागून ७ जणांचा मृत्यू, ५१ जखमी
मुंबई, दि. ६: मुंबईत गोरेगाव येथे उन्नत नगर परिसरात एका इमारतीला आग लागून झालेल्या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला तर ५१ जण जखमी झाले. त्यातल्या पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. आज पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना झाली अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली असून जखमींना नजिकच्या रुग्णालयात दाखल केलं आहे.
इमारतीच्या बेसमेंट मधे लागलेल्या या आगीत सामान, दुचाकी गाड्या आणि इतर उपकरणांचं नुकसान झालं आहे. पहिल्या मजल्यावर अडकलेल्या ३० रहिवाशांना सुखरुप बाहेरकाढण्यात आलं आहे. मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत त्यांनी जाहीर केली असून जखमींच्या उपचारांचा खर्चही राज्य सरकार करणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही दुर्घटनेबद्दल तीव्र शोक प्रकट केला आहे. केंद्रसरकार मृतांच्या कुटुंबांना दोन लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये अर्थसहाय्य करणार आहे.
