पंतप्रधान घरकुल योजनेमध्ये सिंधदुर्ग जिल्ह्याचा संपूर्ण देशात ९३ वा तर राज्यात पहिला क्रमांक
सिंधुदुर्ग, दि. ३: पंतप्रधान घरकूल योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा संपूर्ण देशात ९३ वा क्रमांक आला आहे. जिल्ह्यात हि योजना राबवताना योजनेतल्या ब यादीतील ३,९९४ कुटुंबापैकी ३,६५४ कुटुंबाच्या घरकुल यादीला ऑनलाईन मंजुरी देण्यात आली.
९१.५० टक्के यादी मंजुरीच काम झाल आहे. मंजूर यादीतल्या ३६१८ कुटुंबाना १५ हजार रुपयेप्रमाणे प्रत्येकाला पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे.
तसच आतापर्यंत २६६५ कुटुंबांनी घरकुल बांधून पूर्ण केली आहेत. ६६.७२ टक्के काम झाल असून गेल्या वर्षाचीही २८१० पैकी २६१० घरकुल पूर्ण झाली आहेत.
३१ मार्चला पंतप्रधान घरकुल योजनेच्या अंमलबाजावणीबाबत शासनाने जाहीर केलेल्या क्रमवारीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा ८६.३२ गुण मिळवून राज्यात पहिला आला आहे. तर देशात ९३ वा क्रमांक आहे.
