भीमा कोरेगाव प्रकरणी गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला
मुंबई, दि.१२: भीमा कोरेगाव प्रकरणी आरोपी गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला त्यांनी आव्हान दिलं होतं.
अटक केल्यापासून ९० दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल न झाल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. मात्र नवलखा यांना ३४ दिवस घरातच ठेवल्याने ९० दिवसांची मर्यादा इथे लागू होत नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले होते.
Source – AIR
