केंद्र सरकारच्या निर्णयाचं नागरिक मंचाकडून स्वागत
पुणे/नवी दिल्ली: गॅस धारक आपला गॅस सिलिंडर आता कुठल्याही वितरकाकडून भरून घेऊ शकतात या स्वरूपाचा निर्णय केंद्र सरकारने नुकताच घेतला. प्रायोगिक तत्त्वावर या निर्णयाची काही ठिकाणी अंमलबजावणीही होणार आहे.
त्यात पुणे शहराचा समावेश आहे. या निर्णयाचे स्वागत नागरिक मंच याबरोबरच गॅस वितरकांकडून ही करण्यात येत आहे. या विषयीच्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर म्हणाले.
आजचा हा निर्णय अत्यंत चांगला आणि स्वागतार्ह आहे. ग्राहकांना जास्तीत जास्त चांगली सेवा देण्यासाठी या क्षेत्रातसुद्धा स्पर्धा निर्माण होईल. आणि मग जो जास्त चांगली सर्व्हिस देतोय, अशा डिलरकडे जास्त ग्राहक आकर्षित होतील. आणि ह्यामुळेच या क्षेत्रातील सर्व्हिस कॉलिटीचा दर्जा सुधारेल, त्यामुळे ग्राहकांचा हा सर्वात मोठा फायदा होईल.
ऑल इंडिया एलपीजी डिस्ट्रीब्युटर्स फेडरेशन ऑफ महाराष्ट्रच्या अध्यक्ष उषा पूनावाला यांनीही हा निर्णय सर्व घटकांसाठी योग्य असल्याचं मत व्यक्त केले. अर्थातच हा निर्णय चांगला आहे आणि निश्चितपणे आमची संघटना आणि आमचे वितरक हे कायमस्वरूपी प्रयत्नशील असतील जेणेकरून ग्रहकांना उत्तम सेवा देण्यात यावी.
Source – AIR
