Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

गणेश विसर्जनासाठी राज्यातील पोलिसांसह सबंध शासकीय यंत्रणा सज्ज

गणपती विसर्जनासाठी राज्यभरात तयारी पूर्ण, विसर्जन मिरवणुकीवर पावसाचं सावट

ठाणे, दि. ८ : अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनासाठी ठाणे शहरासह संपूर्ण जिल्हा सज्ज झाला असून स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. ठाणे जिल्ह्यात एकूण ३४ हजार ६२३ घरगुती तर ७४८ सार्वजनिक बाप्पांना उद्या निरोप दिला जाणार आहे.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव निर्माण केले असून विसर्जन मार्गात वाहतूक कोंडी होवू नये यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.  मिरवणुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणे पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली असल्याचं कळवलं आहे.

गणेश विसर्जनासाठी नाशिकही सज्ज

विसर्जनादरम्यान जलप्रदूषण टाळण्यासाठी नाशिक शहरामध्ये विविध उपक्रम राबवले जात आहेत. या उपक्रमांअंतर्गत शहरात २८ नैसर्गिक ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली असून ४३ ठिकाणी कृत्रीम हौद तयार करण्यात आले आहेत. तसंच ‘देव द्या-देवपण घ्या’ या उपक्रमाच्या माध्यमातून मूर्तीदान करण्यात येणार आहे. यासह मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्येच मूर्ती विसर्जनाची सोय व्हावी यासाठी ‘टँक ऑनव्हील उपक्रम’ राबवण्यात येणार आहे.

नदीपात्रात कोणत्याही प्रकारच्या मूर्तीचं विसर्जन होऊ नये यासाठी महापालिकेनं सेवाभावी संस्थांची मदत घेतली असून सहाशे स्वयंसेवक महापालिकेनं तैनात करण्यात केले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी १६ जीवरक्षक तैनात करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

वाशीम जिल्ह्यातही उद्या गणेश विसर्जनाची जय्यत तयारी झाली असून उत्सवात कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्यात पोलीस प्रशासन सज्ज आहे. नियमांचं पालन करुन नागरिकांनी उत्साहात आणि शांततेत गणेश विसर्जन करावं, असं आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलानं केलं आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *