१० दिवसांच्या गणपतींच्या विसर्जनासाठी महाराष्ट्र सज्ज
मुंबई, दि. ९ : महाराष्ट्रात गेले १० दिवस सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या आनंदपर्वाची आज सांगता होत असून, गणेश विसर्जनासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.मुंबई पुण्यासह राज्याच्या विविध शहरात मोठ्या विसर्जन मिरवणुका निघणार असून, त्यासाठी पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे.
मुंबईत समुद्र किनाऱ्यांवर विसर्जनाची तयारी पूर्ण झाली असून, राज्यात इतर शहरात अनेक ठिकाणी कृत्रिम तलाव आणि हौद बांधण्यात आले आहेत. तसच मूर्तीदानाचीही व्यवस्था अनेक स्वयंसेवी संघटनांतर्फे करण्यात आली आहे. पुण्याची सांस्कृतिक ओळख असलेल्या विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ आज सकाळी दहा वाजता महात्मा फुले मंडई इथून होईल. पुण्यातील ही विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी देश परदेशातून नागरिक पुण्यनगरीत दाखल झाले आहेत.
