फादर स्टॅन स्वामी यांना केलेली अटक ही कायद्याला धरून, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचा दावा
नवी दिल्ली, दि.७: फादर स्टॅन स्वामी यांच्या मृत्यूप्रकरणी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे स्वामी यांना केलेली अटक ही कायद्याला धरून होती असा दावा केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं बातमीदारांना सांगितलं की फादर स्टॅन स्वामी यांच्यावर दाखल असलेल्या काही विशिष्ट गुन्ह्यांमुळे न्यायालयाने त्यांचे जामीन अर्ज फेटाळले होते.
भारतात कायदे मोडणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जाते, आपले कायदेशीर हक्क बजावणाऱ्यांच्या विरोधात नाही. फादर स्टॅन स्वामी यांच्या बिघडत्या तब्येतीमुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २८ मेपासून स्वामी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, पण ५ जुलै रोजी आरोग्यविषयक गुंतागुंतीमुळे त्यांचा मृत्यू झाला.
