आर्थिक वाढीचा दर २०२४-२०२५ या वर्षात ६.४ टक्के राहण्याची शक्यता
मुंबई, दि. २८: देशाच्या आर्थिक वाढीचा दर २०२४-२०२५ या वर्षात ६ पूर्णांक ४ दशांश टक्के राहण्याची शक्यता आहे. स्टँडर्ड अँड पूअर्स ग्लोबल या पतमानांकन संस्थेने प्रसिद्ध केलेल्या आशिया पॅसिफिक क्षेत्रातल्या आर्थिक पाहणी अहवालात हा अंदाज व्यक्त केला आहे. Jमात्र अन्नधान्याची भाववाढ, आणि निर्यातीत घट होण्याचीही शक्यता असून त्याचा परिणाम वृद्धिदरावर होऊ शकतो असा इशाराही या अहवालात दिला आहे. इतरही आर्थिक सर्वेक्षण संस्थांनी साधारण असाच अंदाज वर्तवला आहे. भारतीय रिझर्व बँकेचा अंदाज आहे की २०२४-२५ या वर्षात देशाचा आर्थिक वृद्धिदर साडेसहा टक्के राहील.
