कोरोनानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता ‘या’ तापाची साथ येण्याची शक्यता
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाची साथ आटोक्यात आली असली, तरीसुद्धा आता माकडतापाची साथ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणेन सतर्क राहून माकडतापाच्या साथीला प्रतिबंध करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी, असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत करण्यात आलेल्या माकडताप समन्वय समितीच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. आरोग्य यंत्रणेने जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या टेस्ट वाढविण्यावर भर द्यावा, असे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
Source – AIR
