आज पासून फास्ट टॅग अनिवार्य; फास्ट टॅग नसल्यास भरावा लागणार ‘एवढा’ टोल
देशभरातल्या राष्ट्रीय महामार्गांवरच्या टोलनाक्यांवरच्या सर्व मार्गिकांवर गाड्यांना फास्ट टॅग अनिवार्य राहील असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं जाहीर केलं असून यात आता मुदतवाढ मिळणार नसल्याचं नीतीन गडकरी यांनी स्पष्टं केलं आहे.
राष्ट्रीय महामार्ग शुल्क २००८ या कायद्यान्वये फास्टटॅग नसलेल्या वाहनांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे. यावर्षी १ जानेवारीपासून फास्टटॅग सक्तीचे करण्यात आले होते त्यानुसार प्रवासी आणि मालवाहतूक करणाऱ्या अनुक्रमे एम आणि एन वर्गवारीतल्या वाहनांना फास्टटॅग लावणं बंधनकारक होतं. मात्र आजपर्यंत १५ फेब्रवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती.
