काही राज्यांमध्ये सर्वाधिक खरेदीची नोंद
नवी दिल्ली: केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की, भारत सरकारने खरीप विपणन हंगाम २०२१-२२ दरम्यान ८६९.२९ लाख मेट्रिक टन धान खरेदी आणि रब्बी विपणन हंगाम २०२१-२२ दरम्यान ४३३.३२ लाख मेट्रिक टन गहू खरेदी केली आहे. ही आतापर्यंतची सर्वाधिक खरेदी आहे.
चालू वर्षात काही राज्य सरकारांनी सर्वाधिक धान्य खरेदीची नोंद केली आहे.
गहू: पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये रब्बी विपणन हंगाम २०२१-२२ दरम्यान सर्वाधिक खरेदी झाली आहे.
धान: खरीप विपणन हंगाम २०२१-२२ दरम्यान पंजाब, बिहार, गुजरात, तेलंगणा, झारखंड, केरळ, मध्य प्रदेश, ओदीशा, तामिळनाडू, उत्तरखंड आणि उत्तर प्रदेशात विक्रमी खरेदीची नोंद झाली.
भरड धान्य : गुजरात, हरयाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत २०२१-२२ मध्ये सर्वाधिक खरेदी झाली आहे.
