Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

माजी केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले यांचं निधन

माजी केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले यांचं निधन


माजी केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले यांचं आज पुण्यात हृदयविकारानं निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. १९५९ मध्ये त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश केला. राज्याच्या शासनात मुख्य वित्त सचिव, तसंच राज्य वीज मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं होतं. केंद्र सरकारमध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, तसंच नगरविकास मंत्रालयाचे सचिव म्हणून काम केलं होतं. १९९३ मध्ये केंद्र सरकारचे गृहसचिव असताना त्यांनी स्वेच्छा निवृती घेतली.

माधव गोडबोले यांनी १५ इंग्रजी आणि १० मराठी पुस्तकं लिहिली आहेत. त्यांच्या लेख संग्रहाना ४ पुरस्कार मिळाले असून, जवाहरलाल नेतृत्व- एक सिंहावलोकन या पुस्तकाला मराठवाडा साहित्य परिषदेचा यशवंतराव चव्हाण  विशेष वाड्यमय पुरस्कार मिळाला होता. अॅन अनफिनिश्ड इनिंग्ज हे त्यांचं आत्मचरित्र आहे. अपुरा डाव या नावानं त्याचा मराठी अनुवादही प्रसिद्ध झाला आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *