र्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या निव्वळ सदस्य संख्येत मार्च २०२४ मध्ये ७.४७ लाख नवीन सदस्यांची झाली नोंदणी
नवी दिल्ली/मुंबई, दि. २०: ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या २० मे २०२४ रोजी जारी करण्यात आलेल्या तात्पुरत्या वेतनपट आकडेवारीमध्ये मार्च २०२४ मध्ये ईपीएफओने १४.४१ लाख सदस्य जोडल्याचे दिसून आले आहे.
मार्च २०२४ मध्ये सुमारे ७.४७ लाख नवीन सदस्यांची नोंदणी झाली असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले. आकडेवारीचा एक लक्षणीय पैलू म्हणजे यामध्ये १८-२५ वयोगटाचे वर्चस्व आहे, जे मार्च २०२४ मध्ये जोडलेल्या एकूण नवीन सदस्यांपैकी लक्षणीय ५६.८३ % आहे. या संघटित कर्मचाऱ्यांमध्ये सामील झालेल्या बहुसंख्य व्यक्ती प्रामुख्याने प्रथमच नोकरी शोधणारे तरुण आहेत.
वेतनपट आकडेवारी हे दर्शवते की, अंदाजे ११.८० लाख सदस्य बाहेर पडले आणि नंतर ईपीएफओमध्ये पुन्हा सामील झाले. वेतनश्रेणी आकडेवारीचे लिंगनिहाय विश्लेषण उघड करते की, ७.४७ लाख नवीन सदस्यांपैकी सुमारे २ लाख नवीन महिला सदस्य आहेत. तसेच, या महिन्यात निव्वळ महिला सभासदांची भर पडली असून ती सुमारे २.९० लाख आहे. महिला सदस्यांची भर ही अधिक समावेशक आणि वैविध्यपूर्ण कार्यबलाकडे अधिक व्यापक बदलाचे सूचक आहे.
वरील वेतनपट आकडेवारी तात्पुरती आहे कारण कर्मचारी रेकॉर्ड अद्यतनित करणे ही एक सतत सुरु राहणारी प्रक्रिया असल्याने आकडेवारी निर्मिती ही एक सतत सुरु राहणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे मागील आकडेवारी दर महिन्याला अद्ययावत केली जाते.
