Horizontal banners compositions of policeman people in office and criminalists working outside flat shadow vector illustration
कथित चकमकीनंतर विरोधी पक्षांनी उपस्थित केले अनेक सवाल
ठाणे, दि. २४: बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा आज सायंकाळी नाट्यमयरित्या घडलेल्या पोलीस चकमकीत मृत्यू झाला आहे. उपलब्ध माहितीनुसार आरोपी अक्षय शिंदे याला तपास कामानिमित्त तळोजा कारागृहातून पोलीस व्हॅन ने ठाणे येथे आणले जात होते. यावेळी मुंब्रा बायपास जवळ व्हॅन आल्यावर अक्षय शिंदे याने पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या कमरेचे सर्व्हिस पिस्तुल खेचून घेतले व पोलिसांच्या दिशेने ३ गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी निलेश मोरे यांच्या डाव्या मांडीला लागली तर उर्वरित २ गोळ्या इतरत्र झाडल्या गेल्या. यावेळी पोलिसांमार्फत स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले.
