निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात धाव
मुंबई/नवी दिल्ली: महाराष्ट्रात राजकीय गोंधळानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. मात्र आता उद्धव ठाकरे यांच्या ताब्यातील शिवसेना हे नाव घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. खरे तर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांनाही शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्ह हीच पक्षाची ओळख म्हणून आपल्याकडे हवे आहे. या लढ्यादरम्यान खरी शिवसेना ओळखण्यासाठी निवडणूक आयोगात सुरू असलेल्या प्रक्रियेविरोधात उद्धव ठाकरे यांच्या ताब्यातील मूळ शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धडक दिली आहे.
निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाकडे केली असून जोपर्यंत शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय होत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने कारवाई करू नये, असे त्यांचे म्हणणे आहे.
