अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाशी संबधित ४० हून अधिक मालमत्ता ‘ईडी’कडून जप्त
मुंबई, दि. ३: आरकॉम चे माजी अध्यक्ष उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाशी संबधित तीन हजार कोटी रुपयांच्या चाळीसहून अधिक मालमत्ता सक्तवसुली संचलनालयाने जप्त केल्या आहेत. दिल्ली, नोएडा, गाजियाबाद, मुंबई, पुणे, ठाणे, हैदराबाद, चेन्नई, कांचीपुरम आणि पूर्व गोदावरी येथे या मालमत्ता आहेत. अनिल अंबानी यांच्यावरील करज घोटाळा आणि मनि लाँड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
Source – AIR
