Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘ईडी’ कडून देशातील मोठ्या पेमेंट गेटवे कंपन्यांच्या कार्यालयांवर छापेमारी

पे-टीएम, रेझर-पे आणि कॅश-फ्री या तीन कंपन्यांमध्ये ईडीची छापेमारी

बंगळुरू, दि. ४ :  चिनी कंपनीच्या मालकीच्या कर्जाबाबतच्या एका अवैध ऍप विरोधात सुरु असलेल्या तपासामध्ये ईडी, अर्थात सक्तवसुली संचालनालयानं, पेमेंट गेटवे – पे-टीएम, रेजर-पे आणि कॅश-फ्री या तीन कंपन्यांमध्ये काल छापेमारी केली. या कंपन्यांच्या मालकीच्या बंगळुरू इथल्या आस्थापनांसह सहा ठिकाणी ईडीनं तपास मोहीम राबवली. या कारवाईत चिनी नागरिकांच्या नियंत्रणाखालच्या कंपन्यांचे व्यापार परवाने आणि बँक खात्यांमधली १७ कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली.

चिनी व्यक्तींना या कंपन्यांचे बनावट संचालक बनवण्यासाठी भारतीय नागरिकांचे बनावट दस्त-ऐवज वापरले गेले आणि कमाईचा अवैध स्रोत म्हणून त्याचा उपयोग केला गेला असा ईडीचा आरोप आहे. स्मार्ट फोनवर आधारित असलेल्या चिनी कंपनीच्या या कर्जबाबतच्या ऍप विरोधात दाखल झालेल्या तक्रारींमुळे भारतीय तपास यंत्रणा त्यावर लक्ष ठेवून आहेत.

Source – AIR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *