Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निमंत्रणाला मान देऊन २३ देशांच्या जागतिक निवडणूक व्यवस्थापन संस्थांमधील ७५ आंतरराष्ट्रीय पाहुणे देशात दाखल 

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निमंत्रणाला मान देऊन २३ देशांच्या जागतिक निवडणूक व्यवस्थापन संस्थांमधील ७५ आंतरराष्ट्रीय पाहुणे देशात दाखल

मुंबई/नवी दिल्ली, दि. ४: निवडणूकविषयक एकात्मता आणि पारदर्शकतेचे निदर्शक म्हणून भारतीय निवडणूक आयोगाने देशात सर्वोच्च मापदंड धारण करणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकीचे आयोजन करण्याप्रती कटिबद्धतेचे उदाहरण घालून देत या लोकशाही उत्कृष्टतेचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्यासाठी जागतिक निवडणूक व्यवस्थापन संस्थांसाठी (ईएमबीज) सुवर्ण संधी  दिली आहे. देशात सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणूक २०२४ दरम्यान निवडणूक अभ्यागतांचा कार्यक्रम (आयईव्हीपी) आयोजित करून भारतीय निवडणूक आयोगाने आंतरराष्ट्रीय सहकार्याची जोपासना करण्याचे कार्य सुरु ठेवले आहे.

सहभागाचे प्रमाण आणि आवाका यांच्या संदर्भात अशा पद्धतीचा हा पहिलाच कार्यक्रम असून यामध्ये जगभरातील – भूतान, मंगोलिया, ऑस्ट्रेलिया, मादागास्कर, फिजी, किरगीझ रिपब्लिक, रशिया, मोल्दोवा, ट्युनिशिया, सेशेल्स, कंबोडिया, नेपाळ, फिलिपाईन्स, श्रीलंका, झिम्बाब्वे, बांगलादेश, कझाकस्तान, जॉर्जिया, चिली, उझबेकिस्तान, मालदीव्ज, पापुआ न्यू गिनी आणि नामिबिया अशा २३ देशांमध्ये कार्यरत ईएमबीज तसेच संबंधित संस्थांचे ७५ प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. निवडणूक यंत्रणांसाठीच्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठानाचे (आयएफईएस) सदस्य तसेच भूतान आणि इस्रायल या देशांतील माध्यमांचे प्रतिनिधी देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

आज ४ मे रोजी सुरु होत असलेल्या या कार्यक्रमात परदेशातील जागतिक निवडणूक व्यवस्थापन संस्थांच्या (ईएमबीज) प्रतिनिधींना भारतीय निवडणूक यंत्रणेतील बारकावे तसेच जगातील सर्वात मोठ्या लोकशाही व्यवस्थेतर्फे अमलात आणल्या जाणाऱ्या सर्वोत्तम पद्धतींविषयी अवगत करण्यात येईल. उद्या ५ मे रोजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि डॉ. सुखबीर सिंग संधू कार्यक्रमात उपस्थित प्रतिनिधींना संबोधित करतील. त्यानंतर हे प्रतिनिधी लहान लहान गटांमध्ये विभागून – महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या सहा राज्यांना भेटी देण्यासाठी निघतील. हे सर्वजण तेथील निवडणूक प्रक्रिया आणि विविध मतदार संघांमध्ये संबंधित तयारीचे निरीक्षण करतील. ९ मे २०२४ रोजी या कार्यक्रमाचा समारोप होईल.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *