डी.पी. त्रिपाठी यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख
मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी माजी खासदार डी.पी. त्रिपाठी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. श्री. डी.पी. त्रिपाठी उच्च विद्याविभूषित आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व होते. श्री. त्रिपाठी यांच्याशी माझा घनिष्ठ परिचय होता. नेपाळमध्येदेखील ते लोकप्रिय होते. सर्वच पक्षात मित्र असलेल्या त्रिपाठी यांच्या निधनामुळे आपण लोकशाहीचा पुरस्कर्ता असलेल्या उत्तम संसदपटूला गमावले आहे, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
