भारतीय अन्न सुरक्षा आणि मानकं प्राधिकरणाचे FSSAI निर्देश
मुंबई/नवी दिल्ली, दि. २३: दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या वेष्टनावर ए वन किंवा ए टू अशी श्रेणी लिहीली असल्यास ती दिशाभूल करणारी असून ती तात्काळ हटवण्याचे निर्देश भारतीय अन्न सुरक्षा आणि मानकं प्राधिकरणाने दिले आहेत. पॅकबंद अन्नपदार्थ विकणाऱ्या अनेक कंपन्यांच्या दूध, दही, लोणी तूप इत्यादी पदार्थांच्या वेष्टनावर प्राधिकरणाने दिलेल्या परवाना क्रमांकासोबत ए वन किंवा ए टू अशी श्रेणी लिहील्याचं आढळतं. हे वर्गीकरण प्रथिनांच्या रचनेवर आधारित असून स्निग्धाचं प्रमाण हा त्याचा निकष नाही असं प्राधिकरणाने स्पष्ट केलं आहे. दूध, दुधाचे पदार्थ तयार करणाऱ्या तसंच ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपन्यांनी असे श्रेणीचे दावे करू नये, असल्यास ते हटवावे असं अन्न सुरक्षा आणि मानकं प्राधिकरणाने सांगितलं आहे.
Source – AIR
