अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षावर नामुष्कीची वेळ
फेसबुकने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं फेसबुक खातं २ वर्षांसाठी निलंबित केलं आहे. यावर्षी ७ जानेवारीला त्यांचं फेसबुक खातं पहिल्यांदा निलंबित करण्यात आलं होतं.
अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणूक काळात डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा विरोधकांवर खोटे व बेछूट आरोप केल्याचं समोर आलं होतं. त्यावेळीही फेसबुक ने त्यांना तंबी दिली होती. ट्विटर नेही अशाच स्वरूपाची कारवाई त्यांच्यावर केली होती.
फेसबुकचे जागतिक उपाध्यक्ष निक क्लेग यांनी ही माहिती दिली.
