Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनातील कलाकृतींवरील कलाकारांचा हक्क संपुष्टात येणार

महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनातील कलाकृतींवरील कलाकारांचा हक्क संपुष्टात येणार

मुंबई, दि. ६ : राज्य शासनाच्या कला संचालनालयाच्या मुंबई कार्यालयामार्फत दरवर्षी राज्य कला प्रदर्शन आयोजित करण्यात येते. या प्रदर्शनामधील कलाकृती कलाकारांनी पुढील आठ दिवसात घेऊन जाण्याचे आवाहन कला संचालकांनी केले आहे.

राज्य कला प्रदर्शनात इच्छुक कलाकारांकडून कलाकृती मागविण्यात येतात. प्रदर्शन संपल्यावर कलाकृती घेऊन जाण्याची जबाबदारी संबंधीत कलाकाराची असते. मात्र, अनेक कलाकार आपली कलाकृती नेत नसल्याचे निदर्शनात आले आहे. संबंधित कलाकारांनी सदर कलाकृती पुढील आठ दिवसांत घेऊन न गेल्यास त्यांचा त्या कलाकृतींवरील हक्क संपुष्टात येणार असल्याची माहिती कला संचालनालयाने दिली आहे. तसेच सदर कलाकृती निर्लेखनाबाबत कला संचालनालयाच्या स्तरावरून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. अधिक माहितीसाठी 022 – 22620231/ 32 या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *