प्रत्यक्ष कर संकलनात(Direct Taxes) गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २३ टक्के वाढ
प्रत्यक्ष करापोटी चालू आर्थिक वर्षात आत्तापर्यंत जमा झालेल्या रक्कमेत मागच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २३ टक्क्याची वाढ झाली असल्याचं केंद्रीय अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे. चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष करापोटी आत्तापर्यंत ८ लाख ९८ हजार कोटी रुपये जमा झाले आहेत असं अर्थमंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. दिनांक ८ ऑक्टोबर २०२२ पर्यंतच्या प्रत्यक्ष कर संकलनाचे तात्पुरते आकडे स्थिर वाढ नोंदवत आहेत.
दिनांक ८ ऑक्टोबर २०२२ पर्यंतचे प्रत्यक्ष कर संकलन हे दर्शविते की, एकूण संकलन रु. ८.९८ लाख कोटी झाले जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील एकूण संकलनापेक्षा २३.८ % जास्त आहे. प्रत्यक्ष कर संकलन, परताव्याचे निव्वळ, ७.४५ लाख कोटी रुपये जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील निव्वळ संकलनापेक्षा १६.३० % जास्त आहे. हे कर संकलन आर्थिक वर्ष २०२२-२३ साठीच्या प्रत्यक्ष करांच्या एकूण अंदाजपत्रकाच्या ५२.४६ % आहे.
एकूण महसूल संकलनाच्या दृष्टीने कॉर्पोरेट आयकर (CIT) आणि वैयक्तिक आयकर (PIT) चा वाढीचा दर १६.७३ % आहे, तर PIT (STT सह) साठी ३२.३० % आहे. परताव्याच्या समायोजनानंतर, CIT संकलनातील निव्वळ वाढ १६.२९ % आहे आणि PIT संकलनात १७.३५ % (केवळ PIT)/१६.२५ % (STT सह PIT) झालेली आहे.
दिनांक १ एप्रिल २०२२ ते दिनांक ८ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत रु. १.५३ लाख कोटी रुपयांचा परतावा जारी करण्यात आला आहे, जो मागील वर्षातील याच कालावधीत जारी केलेल्या परताव्यांच्या तुलनेत ८१.० % जास्त आहे.
