आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये सकल प्रत्यक्ष कर संकलनात २५.९० टक्क्यांची वाढ
मुंबई, दि. १८: आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 17 डिसेंबर 2022 पर्यंत प्रत्यक्ष कर संकलनाच्या आकडेवारीनुसार, देशात निव्वळ संकलन 11,35,754 कोटी रुपये इतके झाले आहे. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये झालेल्या रुपयांच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात यात19.81% ची वाढ झाली आहे. निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन, 17 डिसेंबरपर्यंत 11,35,754 कोटी रुपये असून त्यात, 6,06,679 कोटी रुपये कॉर्पोरेट कर (CIT) आणि 5,26,477 कोटी रुपये वैयक्तिक प्राप्तिकराचा (निव्वळ परतावा) – ज्यात सिक्युरिटी व्यवहार शुल्कही अंतर्भूत आहे.
आर्थिक वर्ष 2022-23 साठीचे सकल प्रत्यक्ष कर संकलन – (निव्वळ परतावे देण्यापूर्वीचे) 13,63,649 कोटी रुपये इतके आहे. गेल्या वर्षी हे संकलन 10,83,150 कोटी रुपये इतके होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत ह्या संकलनात 25.90 टक्क्यांची वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षांत प्राप्तिकर परतावे देण्याची प्रक्रिया अत्यंत वेगवान करण्यात आली आहे. 17 डिसेंबरपर्यंत पडताळणी झालेल्या 96.5% प्राप्तिकर परताव्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यामुळे, परतावे देण्यात विलक्षण वाढ झाली असून, चालू आर्थिक वर्षांत आतापर्यंत देण्यात आलेल्या परताव्याचे प्रमाण, 109 टक्क्यांनी वाढले आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये कालपर्यंत, 2,27,896 कोटी रुपयांचे आयटीआर जारी करण्यात आले आहेत. गेल्यावर्षी याच काळात 1,35,191 कोटी रुपयांचे परतावे देण्यात आले होते. त्यामुळे यात, 68.57 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसत आहे.
