Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘ट्रॅजीडी किंग’ काळाच्या पडद्याआड !

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन

चैन कैसा जो पहलू में तू ही नहीं
मार डाले ना दर्दे जुदाई कहीं..!
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संवादफेक आणि वैविध्यपूर्ण अभिनयासाठी लोकप्रिय, वयोवृद्ध अभिनेते दिलीप कुमार यांचं आज मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं. ते ९८ वर्षांचे होते.
१९४४ साली ज्वार भाटा या चित्रपटापासून त्यांनी आपली अभिनय कारकीर्द सुरू केली, मुघल-ए-आझम, नया दौर, देवदास, कर्मा, दीवार अशा अनेक चित्रपटातील त्यांचा अभिनय विशेष गाजला. कृष्णधवल पडद्यापासून ते रंगीत पडद्यापर्यंतचा काळ आपल्या भावपूर्ण अभिनयानं गाजवलेल्या या दिग्गज अभिनेत्याला ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणूनही प्रसिद्धी मिळाली. दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्म भूषण आणि पद्म विभूषण पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं होतं.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *