धुळे पोलिस प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षणार्थी ६० पोलिसांना विषबाधा
धुळे: धुळे शहरातल्या पोलिस प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षणार्थी ६० पोलिसांना विषबाधा झाल्याचं वृत्त आहे. रात्रीच्या जेवणानंतर अचानक प्रशिक्षण केंद्रातल्या पोलिसांना उलट्यांचा त्रास सुरु झाला, त्यानंतर त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
विषबाधा झालेल्या पोलिसांमध्ये कोणाची ही प्रकृती गंभीर नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. विषबाधा नेमकी कशी झाली, याचा शोधही घेतला जात आहे.
Source-AIR