Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट; जितेंद्र आव्हाड यांना पदावरून बडतर्फ करण्याची केली मागणी

देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट; जितेंद्र आव्हाड यांना पदावरून बडतर्फ करण्याची केली मागणी

मुंबई: विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. यावेळी त्यांनी नागरिकांना रेशनधान्य मिळण्यात येत असलेल्या अडचणी, कोरोना लढाईतील अग्रदूत डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य सुविधांची तातडीने उपलब्धता, पीपीई किटची गरज, त्यांना पूर्ण वेतन अशा विविध विषयांवर राज्यपालांशी चर्चा केली.

यावेळी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री विनोद तावडे, मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, खा. गोपाल शेट्टीजी, खा. मनोज कोटक, योगेश सागर यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.

तब्लिकी संशयितांवर कठोर कारवाई करण्याची गरज आणि या विषयात कुठलेही राजकारण न करण्याची विनंती करणारे निवेदन त्यांनी राज्यपालांना दिले.

आणखी एका निवेदनातून ठाण्यातील तरुणाला मारहाण प्रकरणी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना पदावरून बडतर्फ करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *