देवेंद्र फडणवीस यांची बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजप प्रभारीपदी नेमणूक
नवी दिल्ली/बिहार: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज अखेर बिहार विधानसभा निवडणुकीसाठी प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी थोड्याच वेळापूर्वी ही घोषणा केली. गेल्या अनेक दिवसांपासून बिहार निवडणुकीसाठी फडणवीस यांना मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. आज अखेर त्यांची बिहार भाजपच्या निवडणूक प्रभारीपदी निवड झाली.
