“उत्तर प्रदेश च्या धर्तीवर लोकसंख्या नियंत्रणासाठी देशव्यापी कायदा करण्याची गरज” – देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि.११: लोकसंख्या नियंत्रणासाठी, उत्तर प्रदेश सरकारनं नुकत्याच जाहीर केलेल्या धोरणाच्या धर्तीवर देशव्यापी कायदा करण्याची गरज विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. ते आज नागपुरात माध्यमांशी बोलत होते.
ज्या राज्यांची लोकसंख्या प्रचंड वाढलेली आहे, त्या राज्यांमध्ये असा कायदा लागू केला पाहिजे. तो लोकसंख्या नियंत्रणासाठी सहाय्यक होईल, असं ते म्हणाले.
