नोटाबंदीच्या निर्णयामुळे काळ्या पैशावर नियंत्रण, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दावा
नवी दिल्ली: नोटबंदीच्या निर्णयामुळे काळ्या पैशावर नियंत्रण, आयकर प्रक्रियेत नियमितता, तसेच आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता आल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नोटबंदी निर्णयाला चार वर्ष पूर्ण झाल्या निमित्तानं पंतप्रधानांनी ट्विटरवरून दिलेल्या संदेशात या बाबी नमूद केल्या आहेत.
चार वर्षांपूर्वी आठ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधानांनी चलनात असलेल्या पाचशे तसंच एक हजार रुपयांच्या नोटा, चलनातून बाद केल्या होत्या.
https://twitter.com/narendramodi/status/1325356770416611333?s=19
