कुप्रसिद्ध दाऊद इब्राहिम व छोटा शकील ची माहिती देणाऱ्यांना एनआयएचं २५ लाखांचं बक्षीस
राष्ट्रीय तपास यंत्रणेनं कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिमवर २५ लाख रुपयांचं बक्षीस लावलं आहे. दाऊदचा हस्तक छोटा शकील वरही एनआयएनं २० लाख रुपयांचं बक्षीस लावलं आहे. त्यांच्या आणखी ३ हस्तकांवर प्रत्येकी १५ लाख रुपयांचं बक्षीस लावण्यात आलं असल्याचं एनआयएनं सांगितलं आहे.
दाऊद इब्राहिम आणि त्याचे हस्तक आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादी कारवायांमधे सहभागी होत असून लष्कर-ए-तय्यबा, अल कायदा आणि जैश ए मोहम्मद या संघटनांसाठी काम करत आहेत. या गुन्हेगारांविषयी माहिती देणाऱ्यांना हे बक्षीस देण्याचं एनआयएनं जाहीर केलं आहे.
