२ आणि ३ डिसेंबरला दादर, प्रभादेवी आणि माहीम भागातील पाणीपुरवठा ‘या’ कारणामुळे बंद
मुंबई, दि.२९: सेनापती बापट मार्गाजवळच्या गावडे चौकात ब्रिटिशकालीन १ हजार ४५० मिलीमीटर व्यासाच्या तानसा मुख्य जलवाहिनीवर गळती आढळून आली आहे.
जलविभाग २ डिसेंबरला सकाळी ८ वाजल्यापासून गळती दुरुस्तीचं काम हाती घेणार असून ३ डिसेंबरला दुपारी २ वाजेपर्यंत हे काम पूर्ण होईल.
त्यामुळे या कालावधीत पालिकेच्या दादर, प्रभादेवी आणि माहीम या विभागात काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नसून काही परिसरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.
या परिसरातल्या नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करुन ठेवावा, तसेच पाण्याचा काटकसरीने वापर करुन सदर जलवाहिनी गळती दुरुस्ती कालावधीमध्ये महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असं आवाहन पालिकेच्या जलविभागानं केलं आहे.
