“प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र आघाडीवर” – कृषि मंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि १ : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत देशामध्ये ३२१८ अर्जांना मंजूरी देण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. महाराष्ट्रात एकूण ५७९ अर्जाना मंजूरी देण्यात आली आहे. महाराष्ट्रापाठोपाठ आंध्रप्रदेश ३२१, कर्नाटक २९५, मध्यप्रदेश २९२, उत्तरप्रदेश २२९, तमिळनाडू २०६, मणिपूर १८३, तेलंगणा १७०, हिमाचल प्रदेश १५८, ओडिसा १५०, पंजाब १४३ व राजस्थान १०७ असे इतर राज्यात मंजूरीचे प्रमाण आहे, असे कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत (PMFME) महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्हयांनी आपला सहभाग नोंदविला आहे. औरंगाबाद, सांगली व पुणे जिल्ह्यांनी या योजनेच्या अंमलबजावणीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या आर्थिक वर्षांत योजनेची माहिती पात्र व गरजू लाभार्थीपर्यंत पोहचवून दर्जेदार कामगिरी करावी, असे निर्देशही कृषि मंत्री भुसे यांनी दिले आहेत.
