ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ चलन फुगवट्याच्या दरात गेल्या महिन्यात घट
मुंबई/नवी दिल्ली, दि. १४: ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ चलनफुगवटा दरात ऑक्टोबरमध्ये घट झाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमधल्या ५ पूर्णांक २ शतांश टक्क्यांच्या तुलनेत या वर्षी ऑक्टोबरमध्ये हा दर ४ पूर्णांक ८७ शतांश टक्क्यांवर आला आहे. हा दर ग्रामीण भागात ५ पूर्णांक १२ शतांश टक्के तर शहरी भागात ४ पूर्णांक ६२ शतांश टक्के होता.
गेल्या महिन्यात घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा वार्षिक दर उणे ५२ शतांश टक्के असल्याचा अंदाज आहे. आधीच्या, म्हणजे सप्टेंबर महिन्यात हा दर उणे २६ शतांश टक्के होता. प्रामुख्यानं, रसायनं आणि रासायनिक उत्पादनं, वीज, कापड, मूलधातू, खाद्य उत्पादनं, कागद आणि कागदाच्या वस्तू इत्यादींच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत घसरण झाल्यानं हा चलन फुगवट्याचा दर उणे राहिला आहे.
Source – AIR
