आता कोविशील्ड लशीचा दुसरा डोस ८४ दिवसांऐवजी २८ दिवसानंतर घेता येणार
मुंबई, दि.३०: पर्यटन अथवा इतर कारणांसाठी विदेशात जाऊ इच्छिणारे नागरिक तसेच शासकीय आणि खासगी आस्थापनेवर कार्यरत कर्मचाऱ्यांना कोविशील्ड लशीचा दुसरा डोस ८४ दिवसांऐवजी २८ दिवसानंतर घेता येईल. मुंबई महापालिका प्रशासनानं यासंदर्भात सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. शासकीय आणि खासगी आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना लस घेताना वैध ओळखपत्र सादर करणे आवश्यक असेल. लसीकरण केंद्रांवरील समन्वय अधिकारी (नोडल अधिकारी) लाभार्थ्यांकडून विहित नमुन्यात अर्ज भरुन घेतल्यानंतर तो प्रमाणित करुन कोविन प्रणालीवर अपलोड करतील.
Source-AIR
