Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

भारतीयांना डावलून परदेशात कोविशिल्ड या लसीची निर्यात केलेली नाही – आदर पूनावाला यांचे स्पष्टीकरण

भारतीयांना डावलून परदेशात कोविशिल्ड या लसीची निर्यात केलेली नाही – आदर पूनावाला यांचे स्पष्टीकरण

कोविशिल्ड या लसीची निर्मिती करणाऱ्या सीरम इनस्टीट्युटने भारतीय नागरिकांच्या लसीकरणाला नेहमीच प्राधान्य देण्याचा दृष्टीकोन ठेवला असून, संस्थेने भारतीयांना डावलून परदेशात कोविशिल्ड या लसीची निर्यात केलेली नाही असे स्पष्टीकरण सिरमचे प्रमुख आदर पूनावाला यांनी केले आहे.

ते पुढ म्हणाले की या लसीची निर्मिती करताना परदेशी संस्थेशी करार झाल्याने, त्यानुसार काही लसींची निर्यात करावी लागली. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात २ ते ३ महिन्यात सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करणे अशक्य असून, या मोहिमेसमोर अनेक आव्हाने आणि समस्या आहेत. सर्व भारतीयांचं लसीकरण होण्यासाठी २ ते ३ वर्षांचा कालावधी लागू शकतो. लसींच उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी सिरम कंपनी प्रयत्न करत असून, त्याच्या वितरणात भारतीयांना प्राथमिकता दिली जाईल तसेच या वर्षाच्या अखेर पर्यंत इतर देशांना लसीची निर्यात सुरू होऊ शकेल अशी माहिती ही पूनावाला यांनी यावेळी दिली.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *