आता १८ वर्षावरील प्रत्येक व्यक्ती कोविड-19 प्रतिबंधक लसीसाठी पात्र
नवी दिल्ली, दि. १९:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, 1 मे पासून 18 वर्षावरील प्रत्येकाला लसीकरणासाठी परवानगी देण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. शक्य तितक्या कमी काळात जास्तीत जास्त भारतीयांचे लसीकरण व्हावे यासाठी केंद्र सरकार गेल्या वर्षभरापासून कठोर परिश्रम करत असल्याचे पंतप्रधानानी सांगितले. भारत जागतिक विक्रमी गतीने जनतेचे लसीकरण करत असून यापेक्षा अधिक वेगाने लसीकरण सुरु ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पद्धतशीर आणि धोरणात्मक दृष्टीकोन, संशोधन आणि विकास यावर क्षमता उभारणी, उत्पादन आणि प्रशासन यावर एप्रिल 2020 पासून भारताच्या राष्ट्रीय कोविड-19 लस धोरणाची उभारणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. व्यापकता आणि वेग वाढवतानाच जगातल्या या सर्वात मोठ्या लसीकरण अभियानाच्या अंमलबजावणीसाठी स्थैर्यावरही लक्ष पुरवण्यात आले आहे.
