ऍस्ट्राझेनेका आणि ऑक्स्फर्डच्या लसींना तातडीच्या वापरासाठी जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता
ऍस्ट्राझेनेका आणि ऑक्स्फर्डच्या कोविड-१९ प्रतिबंधक लसींना जागतिक आरोग्य संघटनेनं काल तातडीच्या वापरासाठी मान्यता दिली.
त्यामुळे ही लस जगभर वापरता येणार आहे. ऍस्ट्राझेनेका, कोरिया प्रजासत्ताक आणि सिरम इन्स्टिट्यूट यांच्यातर्फे या लसीचं उत्पादन केलं जात आहे.
कोविडची साथ नियंत्रणात आणण्याबाबत आणखी एक पाऊल पुढं पडल्याचं संघटनेचे महासंचालक तेद्रोस अधनोम घेब्रेयेसस यांनी नमूद केलं.
ज्या देशांना आत्तापर्यंत लसीकरण सुरू झालेलं नाही तिथं आता आरोग्यसेवकांना आणि जोखीम असलेल्या व्यक्तींना लसीकरण करता येऊ शकेल, असं संघटनेच्या औषध विभागाचे सहायक महासंचालक डॉक्टर मारियांगेला सिमाओ यांनी सांगितलं.
