कोरोना विषाणूवरची लस उपलब्ध होण्यासंदर्भात कालमर्यादा निश्चित करण्यासाठी उच्चस्तरीय समित्या स्थापन
नवी दिल्ली: कोरोना आजारावरील लस निश्चित वेळेत तयार करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं समितीच निर्माण केलं आहे. या लसीची चाचणी तिसऱ्या टप्प्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी दिली आहे. संडे संवाद या आपल्या साप्ताहिक कार्यक्रमात ते बोलत होते. हे जागतिक आव्हान आहे.
आंतरराष्ट्रीय समुदायंनी एकत्र येऊन या आव्हानाचा सामना करायला हवा, असही ते म्हणाले. लोकांनी स्वयंस्फूर्तीने कोरोना विषयक नियमांचं कठोरपणे पालन करावं, असं आवाहनही त्यांनी केलं.
