नवी मुंबईतील खाजगी इस्पितळाने कोविड चाचणीसाठी २२०० ऐवजी आकारले ४५०० रुपये
नवी मुंबई: दिनांक १३ जून रोजी राज्यसरकारने खाजगी लॅब्स ना कोविड चाचणी साठी २२०० रुपये पर्यंत दर आकारण्या बाबत आदेश दिले. पण या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचे काम काही खाजगी लॅब्स व हॉस्पिटल्स करत असल्याबाबत टाक्रारी महाराष्ट्र वार्ता कडे आल्या आहेत.
नवी मुंबईतील कोपर खैरणे स्थित साई ज्योत मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल ने एका महिलेला कोविड चाचणी साठी ४५०० असा दर आकाराला असून हॉस्पिटल प्रशासनाने दिलेल्या पावतीवर सोमवार १५ जून रोजीची दिनांक आहे. पुराव्यादाखल सोबत पावतीही आम्ही जोडली आहे. एका बाजूला विमानाने आलेल्या या आजारामुळे सामान्य जनता मेटाकुटीस आली असून, त्यांचे अर्थचक्रही लॉकडाऊन च्या गाळात रुतले आहे. अशा वेळी त्यांची या ना त्या प्रकारे लूट करण्याचे प्रकार खाजगी लॅब्स, हॉस्पिटल्स कडून खुलेआम होत आहेत. वर सरकारी आदेशाला केराची टोपली दाखवण्यापर्यंत या हॉस्पिटल कम लॅब माफियांची मजल जाणे हे भूषणावह नक्कीच नाही. सरकारने नवी मुंबईतील ‘साई ज्योत मल्टि स्पेशियालिटी हॉस्पिटल’ वर तात्काळ कठोर कारवाई करणे गरजेचे आहे नाहीतर कायद्याचा-सरकारचा कुणालाच धाक राहणार नाही.
राज्याचे आरोग्यमंत्री याची गंभीर दखल घेतली याची आम्ही आशा बाळगतो. अशाच प्रकारचे हॉस्पिटल्स, लॅब्स, मेडिकल दुकानांत काही अनुभव आपल्याला आले तर आम्हाला व्हाट्सअप्प द्वारे ९३७२२३६३३२ या क्रमांकावर व news@maharashtravarta.com या ई-मेलद्वारे जरूर कळवा.
पावती पहा

