कनिष्ठ न्यायालयांचं कामकाज सलग दोन सत्रात चालणार
मुंबई, दि.१९: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून राज्यातल्या सर्व कनिष्ठ न्यायालयांच कामकाज दोन सत्रामधे चालेल. सकाळी साडेदहा ते दीडवाजेपर्यंत पहिली सत्र असेल तर दुसरे सत्र दुपारी २ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत असेल.
उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय समितीनं याबाबतचं पत्रक जाहीर केलं आहे. संबंधित वकील किंवा पक्षकार हेतुपुरस्सर गैरहजर राहिल्याचं लक्षात आलं तर कारवाईचा इशाराही या पत्रकात देण्यात आला आहे.
Source – AIR
