देशांतर्गत मागणीला प्रोत्साहन देण्यासाठी ७३ हजार कोटीची घोषणा
नवी दिल्ली, दि.१२ ऑक्टोबर : देशांतर्गत मागणीचे प्रमाण वाढावे यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज ७३ हजार कोटी रूपयांच्या महत्वाच्या योजनांची घोषणा केली आहे. नवी दिल्ली इथे आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आज या योजनांसंबंधिच्या धोरणात्मक प्रस्तावांची माहिती दिली.
याअंतर्गत प्रवासासाठीच्या रजांकरीता सवलत व्हाऊचर, तसेच आणि सणासुदीसाठी अगाऊ रक्कम वितरीत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यातून एकंदर मागणीत ३६ हजार कोटी रुपयांची वाढ होईल असे त्या म्हणाल्या. याशिवाय केंद्र आणि राज्य सरकारांच्या वतीने ३७ हजार कोटी रुपयांचा भांडवली खर्च केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
