‘कोरोना’ वर तंत्रज्ञानाधारित उपाय सूचवण्याचं पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी तंत्रज्ञावर आधारित माहितीची देवाण-घेवाण करण्याची विनंती केली आहे.
ही माहिती Mygov या पोर्टलवरही देऊ शकाल, असं मोदी यांनी म्हटलं आहे. या माहितीचा अनेक लोकांना उपयोग होऊ शकेल.
जैव-तंत्रज्ञान, नवीन संशोधन, वेगवेगळे अॅ्प या बद्दलची माहिती या पोर्टलवर देता येईल.
कोरोना विषाणूशी संबंधित आलेल्या विविध उपाययोजनातून सर्वोत्कृष्ट उपाययोजनेला पुरस्कारही दिला जाईल, असंही मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.
