कंत्राटी भारातीचा शासन निर्णय रद्द करत असल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
मुंबई, दि. २०: महाराष्ट्रात कंत्राटी भरतीचा शासन निर्णय रद्द करण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केली. राज्यातील कंत्राटी तत्वावर भरतीची सुरुवात काँग्रेसने केली. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळातही कंत्राटी भरती करण्यात आली. मात्र, आता हेच विरोधी पक्ष आता त्याविरोधात आंदोलन करत आहेत असं ते म्हणाले.
काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांनी युवकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालविला आहे. युवकांच्या मनात रोष निर्माण करून राज्याला अराजकतेकडे नेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असा आरोप करत या तीनही पक्षांनी माफी मागावी, अन्यथा जनतेमध्ये जाऊन विरोधकांना उघडं पाडू असा इशारा फडणवीस यांनी दिला. पोलीस दलामध्ये कंत्राटी भरती केल्याचा विरोधकांचा आरोपही फडणवीस यांनी यावेळी खोडून काढला. अंमली पदार्थ तस्कर ललित पाटील कसा फरार झाला याचा शोध घेण्यात येईल असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
Source – AIR
