मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळाल्याने नाराज झालेले काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी काल जालन्यात समर्थकांसह घेतली बैठक
जालना: मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळाल्यानं नाराज झालेले काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी काल जालन्यात समर्थकांसह बैठक घेतली. आतापर्यंत तीन वेळा निवडून आल्यामुळे महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारात पक्षाकडून आपणाला संधी मिळेल, अशी जिल्ह्यातले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची अपेक्षा होती.
पक्षाकडून तसं आश्वासनही देण्यात आलं होतं. मात्र ऐनवेळी आपल्याला डावलल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचं गोरंट्याल यांनी स्पष्ट केलं. यापुढे कार्यकर्ते जो निर्णय घेतील, तो आपल्याला मान्य असेल असं गोरंट्याल म्हणाले.
दरम्यान, जालन्याच्या नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्यासह काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक पक्षश्रेष्ठींची भेट घेवून सामुहिक राजीनामे द्यायचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
(सौजन्य – AIR)
