काँग्रेसची तिसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील पाच उमेदवारांना संधी
लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने आज महाराष्ट्रातील तिसरी यादी जाहीर केली आहे.यामध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.
काँग्रेसकडून चंद्रपूरमध्ये विनायक बंगाडे, औरंगाबादमध्ये सुभाष झांबड, जालन्यात विलास औताडे, भिवंडीत सुरेश टावरे आणि लातूरमध्ये मच्छिंद्र कामनात यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे.
दरम्यान काँग्रेसकडून अजूनही पुण्याचा उमेदवाराच्या नावाची घोषणा झालेली नाही.
काँग्रेस उमेदवार यादी :
चंद्रपूर – विनायक बंगाडे
औरंगाबाद – सुभाष झांबड
जालना – विलास औताडे
भिवंडी – सुरेश टावरे
लातूर – मच्छिंद्र कामनात
