अद्याप जान कुमार सानू कडून माफीनामा नाही
मुंबई, दि. २८: बॉलिवूड गायक कुमार सानू यांचे पुत्र गायक जान कुमार सानू याने कलर्स वाहिनीवरील ‘बिग बॉस’ या कार्यक्रमात मराठी भाषेबाबत केलेल्या अवमानकारक वक्तव्यावरून राज्यातले वातावरण दिवसभर तापलेले होते. या प्रकरणी शिवसेनेतर्फे प्रवक्ते आ. प्रताप सरनाईक यांनी निषेध नोंदवत जान कुमार सानू याची बिग बॉस मधून हकालपट्टी करण्याची कलर्स वाहिनीकडे मागणी केली. तसे न केल्यास सेट वर येत शिवसेना स्टाईल ने अद्दल घडवण्याचा इशारा दिला. मनसेने चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही जान कुमार सानू ने २४ तासांत माफी मागितली नाही तर बिग बॉस शो बंद पाडण्याचा निर्वाणीचा इशारा दिला.
या सर्व पार्श्वभूमीवर अखेर कलर्स वाहिनीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे माफीनामा लिहीत महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली आहे. तसेच हा भाग आपल्या वाहिनीवरून हटविण्यात आला असल्याचे सांगितले. सध्यातरी या प्रकरणी गायक जान कुमार सानूने स्वस्त प्रसिद्धीसाठी मराठी भाषेवर टीका करत सर्वांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसते.
माफीनामा

